Breaking

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

*कोल्हापूर येथे अनोख्या पद्धतीने माता रमाई जयंती कार्यक्रम सोहळा संपन्न*


माता रमाई जयंती सोहळा संपन्न


*हेमंत कांबळे  : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


कोल्हापूर  : आज सिध्दार्थ नगर जुना बुधवार पेठ कोल्हापूर येथे माता रमाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीकारक महिलांच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढे न्यायचा दृष्टीकोनातून सर्व उपस्थित महिलांना क्रांतीकारक महिलांची पुस्तके देण्यात आली. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली.



         सदर कार्यक्रमाला मान्यवर उपस्थितापैकी समाज कल्याण आयुक्त कोल्हापूर जिल्हा मा. विशाल लोंढे साहेब, गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर जिल्हा प्रमुख तानाजी सावंत साहेब ,प्रबोधनकार दयानंद म्हेतर सर, सामाजिक कार्यकर्ते युवराज कांबळे सर, सामाजिक कार्यकर्ते, सदानंद डिगे सर, बौध्द अवशेष समिती कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष टी. एस. कांबळे सर, सामाजिक कार्यकर्त्या मा.स्वाती काळे मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

       सदर कार्यक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा