नवीन सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर अपघात |
*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : नवीन सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर झालेल्या अपघातात उदगावचा २४ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
सदरचा अपघात सोमवारी सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अजित मगदूम २४ रा.जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर असे युवकाचे नाव असून तो एकुलता एक मुलगा होता. मुलगा अपघातामध्ये ठार झाल्याची घटना समजताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. सदरचा अपघातात मयत युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा सांडला होता. जयसिंगपूर पोलिस तपास करीत असो पोलिसाने अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे.
सांगली-कोल्हापूर बायपास मार्गावर असलेल्या एका हॉटेल जवळून शेताकडे जात असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याची माहिती समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सदर ठिकाणी जाऊन कसोशीने तपास करीत आहेत. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती त्यांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबद्दल पुढील तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.
या दुर्देवी अपघाती घटनेने परिसरात मात्र शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा