Breaking

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

*वैभवशाली वारसा लाभलेली मराठी भाषा

 

मराठी भाषा दिवस


         लेखक व सामाजिक कार्यकर्ते                         मा.खडेराव पार्वतीशंकर हेरवाडे,शिरोळ


    भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा चौथा क्रमांक आणि जगात १० वा क्रमांक लागतो. वैभवशाली वारसा लाभलेली मराठी भाषा विसाव्या शतकात अनेक प्रवाहांना आपल्यामध्ये सामावून घेत अधिक समृध्द झाली आहे. एकविसाव्या शतकात ती आधुनिकतेचा बाज घेऊन ती अधिक व्यापक होत आहे.

    मराठी भाषा ही प्राचीन, समृध्द आणि गौरवशाली परंपरा असलेली भाषा आहे. सातवाहन, राष्ट्रकुट आणि अनेक मराठी राजांनी मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला. इतिहासकारांनी केलेल्या संशोधन आणि अभ्यासानुसार दोन ते अडिच हजार वर्षापासुन मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या खुणा आढळून येतात. या अडिच हजार वर्षाच्या वाटचालीत अनेक संतांनी, साहित्यीकांनी, कलावंतानी, संशोधकांनी आणि दैनंदिन व्यवहारात मराठी बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांनीही मराठी भाषा समृध्द करण्यात मोलाचं योगदान दिल आहे.

         मराठी भाषेबद्दल आज काही जणांच्या मनात न्युनगंड आहे. मराठी बोलताना त्यांना कमीपणा वाटतो परंतु ज्यांनी संत तुकारामांच साहित्य वाचलं आहे आणि त्या साहित्यांचा अभ्यास केला आहे. त्यांना हा न्यूनगंड कधीच येणार नाही.

     मराठी अस्मिता म्हणजे नेमके काय हे ठरविण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. इंग्रजी शाळांची वाढती संख्या परप्रांतीयांच्या सोयीसाठी आपणच हिंदी वा अन्य भाषेचा करत आलेला वापर शुध्द भाषेच्या वापराबाबत अनास्था या पार्श्वभुमीवर मराठीच्या प्रचार आणि प्रसाराबाबत व्यापक प्रयत्न गरजेचे आहेत.

         लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी | 

            जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥

      धर्म, पंथ, जात, एक जाणतो मराठी ।

        एवढ्या जगात माय मानतो मराठी ||


     मराठी ही भाषा बोलणारे लोक आज जगातील ७२ देशांत पसरलेले आहेत ते भारताच्या ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात महत्वाच्या पदावर काम करत आहेत. त्यामुळे ही फक्त एका प्रांताची भाषा नसुन ती महत्वाची राष्ट्रीय भाषा आहे.


     जागतीक मातृभाषा दिन व मराठी भाषा दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा