Breaking

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

*सांगोल्यात दोन सख्ख्या भावानी बहिणीने मनाविरुद्ध लग्न केल्याच्या रागातून बहिणीच्या नवऱ्याची केली निर्घृण हत्या*

 

सांगोल्यात बहिणीच्या भावानेच भाऊजीचा केला खून


*सांगोला  : विशेष प्रतिनिधी*


सांगोला  : सांगोला तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  बहिणीने घरच्यांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून दोन भावांनी बहिणीच्या नवऱ्याची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक व धक्कादायक घटना घडली आहे. 

   अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , दोन सख्ख्या भावांनी तीन अनोळखी अनोळखी व्यक्तीच्या  मदतीने बहिणीचा नवरा संजय भगवान चव्हाण रा. महमदाबाद ता. मंगळवेढा यांची निर्घृण हत्या केली आह. सांगोला पोलिसांनी सदर संशयित आरोपी दोघा भावांना अटक केली.

      याकामी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप व तपास अधिकारी हेमंतकुमार काटकर यांनी अवघ्या चोवीस तासांमध्ये  खुनाचा तपास लावला आहे. खुनातील संशयित आरोपी अनिल जकाप्पा पुजारी (व.वर्ष २८) व सुनील जकाप्पा पुजारी (वय वर्ष २७ दोघेही रा. महमदाबाद, हुन्नूर, ता. मंगळवेढा) यांना अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहे.

   या निर्घृण खूनाच्या घटनेने परिसरात संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा