Breaking

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

*कोल्हापुरात ! एका मालिकेतील कलाकाराला विनयभंगाचा गुन्हा खाली अटक*

 

कलाकाराला विनयभंगाच्या गुन्ह्यात केली अटक


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


कोल्हापूर  : चित्रपट व मालिका या मधील कलाकार कोणत्याना कोणत्या पद्धतीने प्रसार माध्यमावर प्रकाशझोत्यात येत असतात. मात्र कोल्हापुरातील छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध मालिकेतील कलाकाराला विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. जितेंद्र पोळ असे संशयित अभिनेत्याचं नाव आहे. (वय वर्ष ३२,कात्ययानी कॉम्प्लेस,कळंबा) 

             कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याला अटक केली असल्याचे समोर येत आहे. शादी डॉट कॉम वरून ओळख झालेल्या मुलीचा पोळकडून विनयभंग करण्यात आल्याचा आरोप फिर्यादी कडून लावण्यात आला आहे.या संशयित अभिनेत्याची त्या मुलीशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यांनतर त्या अभिनेत्याने मुलीला लग्नासाठी आमिष दाखवले. परंतु त्या संबंधित मुलीने हा प्रस्ताव नाकारल्या नंतर, संशयित आरोपी त्याचा सर्वत्र पाठलाग करू लागला.

        तो सतत त्या मुलीवर पाळत ठेवत असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर ती मुलगी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊनसुद्धा त्रास दिल्याचं समोर आलं आहे. मुलीने लग्नाला नका दिल्यानंतर या जितेंद्र पोळ संशयित अभिनेत्याने त्या मुलीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत लज्जास्पद वर्तवणूक केल्याचं फिर्यादी कडून गुन्ह्यात नोंद करण्यात आली आहे.

       आज सकाळी कोल्हापुरातील राजाराम पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी त्याला अटक केल्याचं समोर आलं आहे. रात्री उशिरा य संशयितावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तो एका प्रसिद्ध मालिकेत काम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

      या घटनेने सिनेकलाकार  किंवा मालिकेतील कलाकार असो त्यांचं पडद्यावरील रूप व प्रत्यक्षातील वास्तव रूप यामध्ये फरक दिसून येतो हे आता सिद्ध होत आहे. चाहत्यांचे मात्र याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा