जयसिंगपूर कॉलेजचे यशस्वी विद्यार्थी |
*प्रा.मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज मधील रविशंकर रमेश आंबी यांची महाराष्ट्र शासनातर्फे पीएच.डी. साठी दिली जाणारी महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती आणि नागेश बाबासो कोठावळे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी मध्ये संशोधनासाठी निवड झाली आहे. तसेच कोठावळे यांच्या बाबतची आनंदवार्ता अशी आहे की, ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सेट परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. सदर संस्थेकडून विद्यार्थ्यांना प्रति महिना ₹ ३२,०००/- फेलोशिप मिळणार आहे.
त्याचबरोबर संदीप महादेव निकम या विद्यार्थ्यांने यु.जी.सी.ने घेतलेल्या फिजिक्स विषयाच्या नेट परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. या साठी जयसिंगपूर कॉलेजचे प्राध्यापक डॉ.आर.डी.माने व प्र.प्राचार्य डॉ.मनिषा काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच हे तिन्ही विद्यार्थी डॉ.आर.डी.माने यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.करीत आहेत.
या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या सुयशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा