नवनाथ लवटे याची हत्या |
सांगली : सांगली कॉलेज कॉर्नर जवळ रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घुण खून करून हल्लेखोर पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सांगली कॉलेज कॉर्नर परिसरात रेकॉर्डवरील आरोपी नवनाथ लवटे यांचा गुप्तीने भोसकून निर्घुण खून करण्यात आला. रात्री ८.०० वाजण्याच्या सुमारास दडके गर्ल्स हायस्कूल शेजारी सदरची घटना घडली. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गुप्ती सारख्या धारदार शस्त्राने पाच ते सहा सपासप वार केले. सदर जखमी अवस्थेत असलेल्या लवटेला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मात्र हा हल्ला कशातुन झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले.
या घटनेने कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही घटकाकडून हा हल्ला टोळीयुद्धातून झाले असल्याचे ही माहिती समोर येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा