Breaking

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

*अत्यंत संतापजनक! इचलकरंजीत मुलीकडून जन्मदात्या बापाची हत्या; कौटुंबिक वादातून ही घटना*

 

मुलगी ठरली पित्याच्या खुनाचा कर्दनकाळ


इचलकरंजी : शहरात मुली कडूनच वडिलांचा खून घडल्याची एक धक्कादायक व संतापजनक घटनेची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदर संशयित युवतीने डोक्यात बॅट आणि कटावणी सारख्या शस्त्राने घाव घातल्याचे समोर आले आहे.

     अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीला तीन मुली असून काही दिवसांपूर्वी त्यांनी मोठ्या मुलीसाठी घरालगत छोटी दुकान सुरू करून दिले व तिच्या विवाहासाठी स्थळांची पाहणी सुरू केली होती. मात्र वडील आणि संशयित आरोपी मुलगी यांच्यामध्ये सातत्याने वाद होत होते. मंगळवारी रात्री पुन्हा दोघांच्यामध्ये वाद सुरू झाल्याने संशयित आरोपी युवतीने जन्मदात्या बापास बॅटने मारहाण सुरू केली त्यानंतर कटावणी सारख्या हत्याराने मारहाण करीत गंभीर जखमी केले. अक्षरशः घराच्या भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडले होते. त्याचवेळी नातेवाईकांनी आरडाओरडा केल्याने नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने खासगी

रुग्णालयात त्यानंतर आय जी एम रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे अधिकृत माहिती दिली. सदर घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांचे पथक हजर झाले.

       दरम्यान संबंधित युवती आईसह शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाली होती. गुन्हा केल्याची कबुली जबाब दिला. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

    या घटनेने परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा