मिरजमध्ये नशेखोर तरुणांचा उच्छाद |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
मिरज : मिरजेमध्ये नशेत असलेल्या तरुणानी मालवाहतूक करणारा ट्रक फोडून उच्छाद मांडल्याची घटना समोर येत आहे. नशेखोर तरुणांचा शहरात उच्छाद परत वाढल्याचे दिसून आले. मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे चौक येथे कोणतेही कारण नसताना ट्रकच्या काचा फोडून संशयित तरुणांनी परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम इथून कोल्हापूर कडे लोखंडी अँगल व चैनल घेऊन मिरज मार्गे जाणारा ट्रक महात्मा गांधी चौक येथे पत्ता विचारण्यासाठी थांबला होता. लोखंडी रॉड घेऊन आलेल्या एका नशेखोर तरुणांनी अचानक हल्ला करून ट्रकच्या काचा फोडल्या. ट्रक चालक गुरप्रीत सिंग रा. पंजाब जिल्हा तरुणतारा ह्याला काही समजणे आधी ट्रक वर हल्ला करून संशयित तरुण पळून गेले. या तरुणांनी ट्रकचे मोठे नुकसान केले आहे. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.
नशेखोर तरुणांच्या उच्छादाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे येथील नागरिक व प्रवासी दहशतीच्या सावटाखाली राहत असल्याबाबत बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा