सावकार धुमाळ टोळीला सांगली जिल्ह्यातून तडीपार |
मिरज : मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथील सावकारी करणाऱ्या धुमाळ टोळीतील सहा जणांना पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी सांगली जिल्हयातुन सहा महिने कालावधीकरिता तडीपारीचे आदेश पारीत केला आहे.
मिरज ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे खाजगी सावकारी करणारे शैलेश रामचंद्र धुमाळ (वय ५५), अशिष शैलेश धुमाळ (वय -३०), जावेद बंडु कागवाडे (वय -३० ), अमोल आनंदा सुतार (वय -३५), सुरेश हरी शिंदे ( वय -५६), बाबासो हेरवाडे (वय -६३) सर्व रा. म्हैशाळ, ता.मिरज या टोळीविरुद्ध सन २०१० व २०२१ मध्ये बेकायदेशीरपणे खाजगी सावकारी करुन लोकांना पैसे देवुन दिलेल्या पैशावर भरमसाठ व्याज लावुन लोकांचे कडुन पैसे तसेच जागा, जमीन, इमारत अशा मालमत्ता बळकावुन कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देणे, लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारामारी करणे असे शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे सहा दखलपात्र व दोन अदखलपात्र गुन्हे व तक्रारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे या टोळी विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस निरीक्षक यांना मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी प्रस्ताव सादर केला होता. सहा जणांविरुद्ध सांगली जिल्हयातुन सहा महिने कालावधीकरिता तडीपारी आदेश देण्यात आला आहे.
लोकांच्या कडुन या आदेशाचं स्वागत होत आहे. तसेच या आदेशाने तेथील लोकांना अंशतः दिलासा मिळाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा