बलात्कार करणारा संशयित आरोपीस अटक |
*जीवन आवळे : जयसिंगपूर प्रतिनिधी*
जयसिंगपूर : गतिमंद मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी संशयितास तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.अडीच महिन्यापूर्वी पीडित तरुणीचे आई-वडील हे कामावर गेले असताना संशयित आरोपीने शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली. पीडित तरुणीवर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिच्या आईने जयसिंगपूर पोलिसात ठाणेत फिर्याद दिली. सदर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी संशयित आरोपी आनंदा निवृत्ती मोहिते वय वर्ष ३७ रा.नरंदे ता. हातकणगले याला अटक केली.
येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला त्यानंतर न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी दिली.
सदर घटना व संशयित आरोपी विरुद्ध संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा