मा.गजानन पळसे, प्र. संचालक शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर २०२१ हिवाळी सत्राच्या परीक्षापैकी विद्यापीठस्तरावरील आज दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी M.Com. M.Com. (Valuation of Real Estate), PG Degree Master of Valuation Real Estate, M.Sc., B.J.. M.J., M.A./ M.Sc Geography M.A., B.Sc. (Computer Sc.). B.Com, B.A., BCA, BBA, MSW. BSW. Bachelor of Interior Designing, B.A. (Dress Making & Fashion Co-ordination), Bachelor of Designing. या अभ्यासक्रमाच्या एकुण २२७ विषयांच्या परीक्षा पार पडल्या. आजच्या परीक्षेसाठी ५८५२० विद्यार्थ्यापैकी ५५१७९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली. परीक्षेस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण है शेकडा ९४.२९ इतके होते.
आज परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्या पैकी एकुण १२२ विद्यार्थी परीक्षा देत असताना संशयास्पदरित्या हालचाल करताना विद्यापीठाच्या विशेष पथकास आढळून आले असून त्याच्यावर विद्यापीठ नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.
आज दि.२३ / २ / २०२२ रोजी B.Sc. Food Technology Sem I या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला.
(शनिवार दि. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने या दिवशी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रविवार दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येतील याची नोंद संबंधित विद्यार्थ्यांनी घ्यावी.)
या परीक्षेपासून विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणा-या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रॉक्टरींग पद्धत सुरु केली आहे. यासाठी विद्यापीठाकडून विशेष पथक नेमण्यात आले आहे. सदर पथकाकडून आज कामकाज करून प्रत्यक्ष हेडफोन वापरून गैरप्रकार करणा-या अन्य मोबाईल वापरून इतरांशी दूरध्वनीवरून बोलणारे, एकाच फ्रेममध्ये दोन विद्यार्थी दिसणारे इ. अशा विद्यार्थ्यांवर गैरप्रकार म्हणून प्रत्यक्ष नोंद करून परीक्षा प्रमाद समितीमार्फत नियमानुसार कारवाई विद्यापीठामार्फत करण्यात येणार आहे. तसेच परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच ऑनलाईन परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री गजानन पळसे परिपत्रकाद्वारे दिली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा