कु.श्वेता बोराटे हिची अभिनंदनीय निवड |
*प्रा.अक्षय माने : विशेष प्रतिनिधी*
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य या स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. श्वेता अशोक बोराटे यांची 'भारत सरकारच्या पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरण' येथे ऑफिसर वर्ग १ या पदावर निवड झाली आहे. कु. श्वेता अशोक बोराटे ही धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागातून वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाली असून ती एक हुशार व होतकरू विद्यार्थिनी म्हणून सर्वाना परिचित आहे.
सन २०१८ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत देखील तिने उज्वल यश संपादन करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातलेली आहे. -
कु. श्वेता हिने पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरण या भारत सरकारच्या संस्थेत ऑफिसर वर्ग -१ या पदावर तिने संपादन केलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थी भारत सरकारच्या सेवेत रुजू झाल्यामुळे रयत शिक्षण संस्थेची प्रतिमा उंचावण्या बरोबरच सर्वसामान्य विद्यार्थी वर्गास प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना महाविद्यालयाच्या प्राचार्या व रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव प्रिं. डॉ प्रतिभा गायकवाड यांनी व्यक्त केली. तिच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.डॉ अनिल पाटील,संस्थेचे सचिव प्रिं डॉ विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्रिं. डॉ प्रतिभा गायकवाड, ऑडिटर प्रिं. डॉ शिवलिंग मेनकुदळे, उपप्राचार्य, प्रोफ. डॉ विठ्ठल सावंत, नॅक समन्वयक प्रो. डॉ गणेश जाधव, प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विजय कुंभार, कार्यालय प्रमुख श्री.राजेंद्र मेचकर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. श्वेता हिचे अभिनंदन केले.
तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा