प्रा.डॉ.हेमंत कठरे कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : प्रा.डॉ. हेमंत ना.कठरे (विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, कोल्हापूर विभाग,कोल्हापूर) यांना यशवंत ब्रिगेडमार्फत 'छ. शिवाजी महाराज राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार-२०२२' प्रदान करण्यात आला.
शिक्षण सहसंचालक प्रा.डॉ.हेमंत कठरे यांनी शैक्षणिक प्रवासात दिलेलं बहुमूल्य योगदान त्याचबरोबर आजपर्यंत केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थिदशेपासून आज तागायत त्यांनी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाशी जोडलेली नाळ त्याचबरोबर प्राध्यापक म्हणून अध्यापन व संशोधनात्मक कार्य खूप महत्त्वाचे आहे. अत्यंत अभ्यासू, संवेदनशील, प्रसन्न व्यक्तिमत्त्व व उत्तम व्यवस्थापन व प्रशासकीय कार्यकुशलतेची उत्तम हातोटी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे निवडक वैशिष्ट्ये आहेत. तसेच कोल्हापूर विभागीय सहसंचालक पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी प्राध्यापक व अन्य घटक हितार्थ केलेले नाविन्यपूर्ण काम कौतुकास्पद असल्याचे सर्वांकडून बोलले जात आहे.
डॉ. हेमंत कठरे यांना या पुरस्काराने सन्मानित केल्याने खऱ्या अर्थाने या पुरस्काराने त्यांच्या कार्याला आणखी बळ मिळणार आहे. हा पुरस्कार प्रदान करताना प्रा.डॉ. संतोष कोळेकर , प्रा. डॉ. मछिंद्र गोफने, मा. जम्बराव शेळके , प्रा. डॉ. धायगुडे, मा. यशवंतराव शेळके, प्रा. समाधान बनसोडे , प्रा. युवराज मुळे, प्रा. डॉ. अमोल रासकर,प्रा. डॉ. गुरखे, धोंडीराम कारंडे , बीराप्पा धनगर, विलास अनुसे, भूपाल भिसे , विजय अनुसे,अमोल सर ,नितीन खोत व अन्य घटक मोठ्या संख्येने उपस्थित होता.
डॉ.कठरे यांना मिळालेला या पुरस्काराने शैक्षणिक वर्तुळातील सर्व घटकाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अभिनंदन सर
उत्तर द्याहटवाHonored excellently
उत्तर द्याहटवा