Breaking

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

*कुरुंदवाड येथे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू ; संशयित आरोपी पवन कित्तुरेला अटक*


कुरुंदवाड हल्ल्यातील जखमी नागेश यांचा मृत्यू


*प्रा. चिदानंद अळोळी : कुरुंदवाड प्रतिनिधी*


कुरुंदवाड  : दारूच्या नशेत दगडाने झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नागेश रुद्राप्पा वडर रा. बैलहोंगल  जि. बेळगाव कर्नाटक या तरुणाचा सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मारहाण प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी पवन कित्तुरे रा. कुरुंदवाड ता.शिरोळ याच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

        याबाबत अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मयत नागेश वडर व संशयित आरोपी पवन कित्तुरे दोघे एकमेकांचे ओळखीचे मित्र होते. परंतु पवन कित्तूर याने  दारूच्या नशेत नागेश यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी व दगडाने पोटावर व छातीवर जबर मारहाण केली होती. या घटनेनंतर जखमी नागेश वडरला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला आहे.

     अधिक तपास सहाय्यक फौजदार विजय घाटगे करीत आहेत. या घटनेने सदर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा