जयसिंगपुरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम लस द्या बाळा पोलीओ टाळा |
करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
जयसिंगपूर : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने या वर्षी जिल्हयामध्ये रविवार दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असलेची माहिती जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी व प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ पी. आर. खटावकर, डॉ. मोघे मॅडम, व उपमुख्याधिकारी डॉ पवन म्हेत्रे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिलेली आहे.
सदर पल्स पोलिओ मोहिमेची एकच फेरी आयोजित केली जाणार असून या मोहिमेमध्ये जयसिंगपूर शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ५१८१ इतक्या लाभार्थ्यांना पोलीओ लसीचा डोस देणेत येणार आहे. शहरातील विविध भागामध्ये एकूण ३२ पोलीओ बूथ स्थापन केलेले असून रेल्वे स्टेशन, एस. टी. स्टॅन्ड इ ठिकाणी ट्रॅझिट टीमची व्यवस्था केलेली आहे. तसेच खाजगी दवाखाना व इतर शहराजवळील बाहय परिसरात फिरण्यासाठी मोबाईल टिमची सोय केलेली आहे. या करीता नागरी विभाग प्रा. आ. केंद्र जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूर व जे.जे. मगदूम नर्सिंग कॉलेज इ. संस्थांकडील ९५ कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यावेळी नागरी विभागाचे सुपरवायझर पी. एन. काळे, सुनिल आलासकर, डी.बी गायकवाड, व सर्व नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.
तरी जयसिंगपुर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना जवळच्या पोलिओ लसीकरण बुथवर जाऊन पोलीओ डोस द्यावा व राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा