Breaking

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

*शिरोळ पोलिसांची जबरदस्त कामगिरी ; संभाजीपूर येथील मोबाईल चोरीचा छडा लावणेस शिरोळ गुन्हे शोध पथकाला यश...*


शिरोळ पोलिसाने मोबाईल चोरट्यास पकडले

*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*


   संभाजीपूर : येथील हॉटेल पिंगरा शेजारी झालेल्या मोबाईल चोरीचा छडा लावणेस शिरोळ गुन्हे शोध पथकास यश मिळाले असून मिरज जि. सांगली येथील संशयितास ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरीस गेलेला REALME C-11 कंपनीचा मोबाईल जप्त केला. 

    शिरोळ पोलीस ठाणे गु. र. नं २६९/२०२१ भा. द. वि.स. कलम  ३७९ प्रमाणे  गुन्ह्यातील फिर्यादी सुलेमान नदाफ वय वर्ष २७ रा. नदाफ गल्ली जत ता. जत जि. सांगली यांच्या मालकीचा मोबाईल हे त्याचे नातेवाईक यांच्या घराच्या टेरेसवर झोपलेले असता अंथरूनावर ठेवलेला रियलमी सी ११ कंपनीचा मोबाईल फिर्यादी याचे संमतीशिवाय चोरून लबाडीचा उद्देशाने नेलेबाबत फिर्यादी  दिली होती. 

         सदर गुन्ह्याचा तपासाबाबत मा. पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरीगिड्डे   ‌शिरोळ पोलीस ठाणे यांनी गुन्हे शोध  पथकाकडील अमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सांगितले होते. त्याप्रमाणे सदर गुन्ह्याबाबत सखोल तपास करून मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील संशयित इसम नामे इमदाद साहेबचांद पटेल व. व ३४ रा. हाजी हाजी चांद कॉलनी मिरज ता. मिरज जि. जिल्हा सांगली याचा सदर गुन्ह्यातील सहभाग असल्याबाबत गुन्हे शोध पथकाच्या खात्री झाल्याने त्याला सापळा रचून मिरज शास्त्री चौक परिसरातून शिताफीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत त्याची कसून चौकशी केली असता. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यास चोरीस गेलेला रियलमी कंपनीचा c११ मोबाईल किंमत ७०००/-  रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 

    सदर आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपीना गुन्ह्याच्याकामी अटक करणे आलेली आहे.  गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. कॉ २/१३०३ पाटील हे करीत आहेत.

       सदर कारवाई मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ प्रदीप कुंभार, राजाराम पाटील, पोलीस नाईक तहीर मुल्ला, अमलदार  रहिमान शेख व संजय राठोड या पथकाने उत्तम पद्धतीने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा