Breaking

बुधवार, २३ मार्च, २०२२

*प्रा. संजय ठिगळे पद्मश्री पा. वा. गाडगीळ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित*

 

खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा.संजय ठिगळे


*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर  : भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे  प्रमुख प्रा. संजय ठिगळे यांना लोकमत वृत्तसमुहातर्फे देण्यात येणारा पत्रपंडित,पद्मश्री पां. वा. गाडगीळ राज्यस्तरीय  पुरस्कार जेष्ठ संपादक आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राजेंद्र दर्डा होते.कार्यक्रमास अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार आणि द वायरचे संपादक मा.सिद्धार्थ वरदराजन, खासदार कृपाल तुमाने, विभागीय आयुक्त  प्राजक्ता लवांगरे आणि विजय दर्डा उपस्थित होते.पुरस्कार वितरण सोहळा नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉइंटच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

      प्रा. संजय ठिगळे गेली तीन दशके विविध वृत्तपत्रातून विकासाभिमुख आर्थिक लेखन करीत आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'अर्थभान' पुस्तकास अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेषतः 'लॉक डाऊनचा झटका अन् अर्थव्यवस्थेला फटका' या त्यांच्या लेखाची दखल घेऊन त्यांना सन २०१९-२० चा आर्थिक विकास लेखन राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 

    पुरस्काराबददल प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा. संजय ठिगळे म्हणाले कि, अर्थशास्त्रासारखा अवघड विषय सर्वसामान्य माणसाला समजेल अशा साध्या सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न वृत्तपत्रीय लिखाणाद्वारे केल्यामुळेच मला पुरस्कार प्राप्त झाला.

पुरस्कार प्राप्त झालेबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह मा.ना.डॉ विश्वजीत कदम, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, प्राचार्य. डॉ. व्ही. वाय. कदम त्याचबरोबर भारती विद्यापीठाचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

     प्रा. संजय  ठिगळे यांना पत्रपंडित, पद्मश्री पां.वा.गाडगीळ आर्थिक पत्रकारिता पुरस्कार प्रदान करित असताना जेष्ठ पत्रकार आणि खासदार संजय राऊत त्यांच्यासमवेत जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ वरदराजन, सौ. सुवर्णा ठिगळे,विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा इ. मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा