दत्त कॉलेजमध्ये बारावी बोर्ड परीक्षा |
*प्रा.अमोल सुंके : कुरुंदवाड प्रतिनिधी*
कुरुंदवाड : येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय व सहकार भूषण एस. के. पाटील महाविद्यालय असे दोन परीक्षा केंद्रे बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या कालखंडात शिक्षण ऑनलाइन असल्याने व शिक्षण विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी तीन तासांचा होणारा 80 गुणांच्या पेपरासाठी यंदा वाढीव अर्धातास विद्यार्थ्यांना मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते.
कुरुंदवाड येथील श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मास्क व सॅनीटायझर संदर्भात सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षकांकडून थर्मल टेस्टिंग करण्यात आले. महाविद्यालयात कॉपी मुक्त वातावरणात पेपर व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर.जे. पाटील व ज्येष्ठ प्रा.एम. आर. पवार यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र बाकावर बसविण्यात आले होते. परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी परीक्षा केंद्रावर हजर होते. परीक्षा केंद्रास कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील सहा. पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी भेट दिली.
एसटी संप सुरू असल्यामुळे आपल्या पाल्यांना वेळेत महाविद्यालयात पोहोचविण्यासाठी मोठ्या संख्येने पालक महाविद्यालयाच्या बाहेर उभे असल्याचे चित्र होते. इयत्ता बारावीचे बोर्ड परीक्षेचे आपल्या पाल्याच्या आयुष्यातील महत्व जाणून असल्याने पेपर सुरू झाल्यापासूनच पालकांची धाकधूक सुरू होती पण पेपर संपल्यानंतर आपल्या पाल्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून पालकांना समाधान वाटले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा