मा.शशिकांत घाटगे |
*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
शिरोळ : शिरोळ तालुका मातंग समाज संघटना पदाधिकाऱ्यांचा संवाद व संपर्क दौरा पूर्ण झाला असून आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक शिरोळ तालुका मातंग समाज संघटना पुर्ण ताकदीने लढविणार असा निर्णय सर्व मताने मान्य झाला आहे.
आज पर्यंत कुठल्याही पक्षांनी मातंग समाजातील कुठल्याही उमेदवाराला संधी दिली नाही. आज पर्यंत मातंग समाजाचा मतापुरता जाणीवपूर्वक वापर केलेला आहे. त्यामुळे आम्ही शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने पंचायत समिती व जिल्हा परिषद अनुसूचित जाती राखीव मतदारसंघ जिथे पडेल तिथे मातंग समाज संघटनेचा उमेदवार उभा करणार असा निर्णय या बैठकीमध्ये झाला असून उमेदवार ताकदीने निवडून आणणार आहे.
यावेळी या बैठकीस दतवाड जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते खंडोबा मोरे, विजय कांबळे जितेंद्र बिरणगे, सागर बिरणगे, रमेश बिरणगे व अकिवाट जिल्हा परिषद मतदार संघातील संदीप बिरणगे, रावसाहेब गस्ते, मनोज नाटेकर. लाट जिल्हा परिषद मतदार संघातील प्रशांत आवळे,संजय आवळे ,युवराज गायकवाड तेरवाड, बबन गायकवाड हेरवाड. यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघ शशिकांत घाटगे,किरण आदमाने दानोळी मतदार संघातून सुनील कांबळे चिपरी, संगीता व्हसमणे नितीन वायदंडे उपस्थित होते.
बैठकीचे नियोजन शशिकांत घाटगे व संदीप बिरणगे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा