![]() |
✍🏼 मालोजीराव माने - कार्यकारी संपादक
जागतिक जल दिनानिमित्त श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी डॉ.मनोज पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
![]() |
प्रमुख पाहुणे : मा.डॉ.मनोज पाटील सर |
भारत हा पहिल्यापासूनच विविध गोष्टीत समृध्द असा देश आहे. त्यामुळेच संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे होते आणि आहे. जगाच्या तुलनेत भारतीयांची बुद्धीमत्ता आणि सामर्थ्य अधिक आहे. त्यामुळे भारत लवकरच पाणी टंचाई व प्रदूषणावर मात करेल असे मत डॉ. मनोज पाटील यांनी व्यक्त केले. भारत हा शाश्वत विकासाचा आदर्श आहे. पाणी टंचाई व प्रदूषणावर मात करण्यासाठी भारताच्या प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य निभावणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
जल दिनाच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही पोस्टर, व्हिडिओ, रांगोळी, पी.पी.टी प्रेझेंटेशन द्वारे आपले विचार व्यक्त केले.
![]() |
विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोस्टर्स व देखावे |
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी. मरजे यांनी भूषवले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.सुशील कुमार व किर्ती कुल मार्गदर्शक डॉ. नवनाथ इंदलकर सर यांनी केले होते. तसेच कार्यक्रमासाठी डॉ. युवराज पवार, श्री. दयानंद बोंदर, श्रीमती गायत्री जाधव, ग्रंथपाल श्रीमती संध्या यादव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएड विद्यार्थिनी पुनम गतारे व सारिका पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विद्यार्थी सादिक सुतार याने केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा