![]() |
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे |
रविवार दि. २७ मार्च रोजी सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली महाविद्यालत सन २०२१ - २२ सालचे वार्षिक परितोषिक वितरण व स्नेहसम्मेलन उत्साहात पार पडले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक मा.श्री.महेश चोथे तर अध्यक्ष म्हणून सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.नितीन खाडीलकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे यांनी करून दिला.सदर कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या नुतनीकरणामध्ये हातभार लावणार्या मा. श्री. विलासभाई शाह,सौ.व श्री बाळकृष्ण पाटणकर, सौ.व श्री सुरेन्द्र स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना परितोषिक देवून गौरवण्यात आले. त्याचबरोबर ‘आम्ही’ या विद्यार्थ्याच्या हस्तलिखिताचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
बी.एड. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्रमुख पाहुणे मा.श्री.महेश चोथे सरांनी वाचनाचे महत्व अधोरेखित केले. तसेच आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, शैक्षणिक पात्रता, गुणवत्ता,अभिरुची,शरीरप्रकृती तसेच अभियोग्यता या सप्तसुत्रींचा अंगीकार करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
![]() |
श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेजचे शिक्षकगण कॉलेजची माहिती व उपक्रम सांगताना |
कार्यक्रमाचे नियोजन तसेच महाविद्यालयाचे अहवाल वाचन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुशील कुमार यांनी केले. एण्डोंमेंट व अन्यपुरस्कारांचे वाचन डॉ. युवराज पवार यांनी केले. प्राध्यापकांचे अहवाल वाचन डॉ.नवनाथ इंदलकर यांनी केले. ग्रंथालयाचे अहवाल वाचन सौ. संध्या यादव यांनी तर ‘आम्ही’ चे मनोगत श्री. दयानंद बोंदर यांनी केले.
दुपारच्या सत्रात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये प्रथम, द्वितीय तसेच गतवर्षीच्या विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य तसेच विविध कलागुण सादर केले.
![]() |
स्नेहसंमेलनातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले काही क्षण |
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संध्या यादव व सौ. गायत्री जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह मा.श्री.शिरीष गोसावी,अन्य पदाधिकारी,विविध शाळांचे मुख्याध्यापक, माजी प्राध्यापक, माजी विद्यार्थी,महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा