![]() |
एनएसएस शिबिरात मार्गदर्शन करताना प्रा.अभय जायभाये |
*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
*नाईट कॉलेज,इचलकरंजीच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास शिवनाकवाडी येथे प्रारंभ*.
इचलकरंजी- श्रमसंस्कार शिबीराच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यातून ग्रामीण भागाचा विकास केला पाहिजे. खेडी पूर्वीपासून परिपूर्ण आहेतच पण त्यांना जागतिकरणाच्या रेट्यात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांची मातीशी नाळ जोडली पाहिजे. ग्रामिणत्व अबाधित राहण्यासाठी आवश्यक सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. असे मत शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. अभय जायभाये यांनी मांडले. ते शिवनाकवाडी ता.शिरोळ येथे नाईट कॉलेज इचलकरंजीच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री. अरुणरावजी खंजिरे यांनी ग्रामीण भागातील लोकांचा चांगुलपणा, संस्कार यांचा अनुभव घेत सहजीवनाचा आनंद घेण्याचे विद्यार्थांना आवाहन केले. यावेळी प्राचार्य डॉ पुरंधर नारे , शिवनाकवाडीचे सरपंच श्रीकांत खोत, उपसरपंच सचिन पुजारी, पुंडलिक भिलवड़े प्रमुख मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
सात दिवसाच्या श्रमसंस्कार शिबिरात 'माझा गावं कोरोनामुक्त गावं' हे ध्येय समोर ठेवून सामाजिक स्वच्छता उपक्रम, श्रमदानासह विविध समाजोपयोगी व्याख्याने व प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आलेले आहे. स्वयंसेवकांकडून लघुनाटिका, पथनाट्याचे सादरीकरण केले जाणार आहे. यावेळी शिवनाकवाडीचे ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच अशोक खोत, विवेक खोत, नानासो पुजारी, सौ. अश्विनी खोत, सौ. भारती आरगे, शिवाजी खोत सर प्रा. मिलिंद दांडेकर, प्रा. अजय कांबळे, डॉ. प्रवीण पोवार डॉ. सौ. एस. एस. सय्यद, प्रा. सौरभ पाटणकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थीनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. आर. मुंडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. साईनाथ चपळे यांनी करून दिला. आभार प्रा. डॉ. रामेश्वर सपकाळ यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. एफ. एन. पटेल यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा