![]() |
लेंगरे येथे ऊसाचा फड जाळताना शेतकरी |
*प्रा. इम्रान मणेर : विशेष प्रतिनिधी*
विटा : कारखान्यात केवळ मोठमोठ्या नेत्यांचा व त्यांच्या नातेवाईकांचा ऊस जातो व गरीब शेतकऱ्याच्या ऊसास ऊसतोडणी कामगार मिळत नाही म्हणून एका संतप्त शेतकऱ्यांने स्वतःच्या शेतातील एक एकर ऊस जाळण्याचे कृत्य केले.
सविस्तर बातमी अशी की, लेंगरे येथील शेतकरी विजय कुलकर्णी यांनी आज दुपारी आपला एक एकर ऊस हा तोडणी कामगार न आल्याने पेटवून दिला. सत्यता अशी होती की, शेतामधून ऊस नेता यावा म्हणून उसातून ट्रॅक्टर साठी मार्ग तयार केला. तोडणी कामगार ऊस तोडण्यासाठी आले होते. ऊस तोडायला सुरुवात देखील केली मात्र मुकादमास एका राजकीय पुढाऱ्याने फोन केला त्यानंतर त्या शेतकऱ्याचा ऊस तेथेच सोडून सर्व तोडणी कामगार त्या राजकीय पुढाऱ्याच्या शेतामध्ये गेले व आठ दिवसानंतर येतो असे सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आपला संपूर्ण ऊस पेटवून दिला. अशा प्रकाराकडे जिल्हाधिकार्यांनी लक्ष दिले पाहिजे असे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा