बामनोली येथे प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या |
सांगली : कुपवाड पासून जवळच असणाऱ्या बामणोली गावातील दत्त नगर मध्ये एका खताच्या गोडाउन मध्ये प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दत्तनगर परिसर बामणोली गावात आहे तेथे असलेल्या ऑर्बिट क्रोप मायक्रो न्यूट्रीयम नावाच्या खताच्या कारखान्याच्या गोडाउन मध्ये आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली
पांडुरंग दादासाहेब धुमाळ वय वर्ष २१ रा.चिंतामणी नगर आरटीओ कार्यालय झोपडपट्टी सांगली आणि काजल सुरेश सायार वय वर्ष १६ रा. दत्तनगर बामणोली असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत. यातील मयत पांडुरंग धुमाळ खताच्या कारखान्यात कामाला होता तर मुलगी ही शाळा शिकत असून ती अल्पवयीन आहे. या मुलीच्या घराजवळच असलेल्या खताच्या कारखान्यात पांडुरंग कामाला होता तिच्या घराच्या जवळच असल्याने त्या दोघांचे सूत जुळले असावे.त्यांनी खताच्या गोडाऊन मधील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आपले जीवन संपवले या घटनेचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
दिनांक १२ मार्च ते १४,मार्च २०२२ रोजी सकाळपर्यंत घटना घडल्याची प्राथमिक अंदाज आहे. साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान गोडावन मध्ये आलेल्या कामगारांना दोघांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.त्यानंतर कामगाराने कुपवाड एमआयडीसी पोलिसांना कळविले. याची माहिती घेऊन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कुपवाड मधील आयुष टीमच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.आयुष टीमचे प्रमुख अविनाश पवार,सुरज चिंतामणी पवार,यश मोहिते व अभिषेक तांबे यांच्या मदतीने मृतदेह खाली काढण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. काही महिन्यापूर्वी बामणोली परिसरातच घटना घडली होती त्यानंतर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा