मंदिरात धाडसी चोरी |
*प्रा. इम्रान मणेर : विशेष प्रतिनिधी*
विटा : येथे दोन प्रमुख मंदिरांमध्ये चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असून जवळपास पाच ते साडेपाच हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
या विषयी प्राप्त झालेली माहिती अशी की, कराड रस्त्यालगत हनुमान मंदिरातील कपाट फोडण्यात आले, तर क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळील सेंट्रल स्कूल जवळील कल्लेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी गायब केली. हा चोरीचा संपूर्ण प्रकार मंदिरासमोरील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. या प्रकारात जवळपास पाच ते साडेपाच हजारांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चोरीमध्ये फोडण्यात आलेली पेठी मंदिराच्या बाजूला एका शाळेच्या आवारात आढळून आली. याविषयी पुजारी पिराजी मुळे यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे.
या घटनेने भाविकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा