Breaking

बुधवार, २ मार्च, २०२२

*ऐंशी वर्षाच्या वृद्धाने स्वतःचे सरण रचून चित्तेत उडी मारून जीवन प्रवास संपविला*


वृद्धाने चितेत उडी मारून केली आत्महत्या


     महाशिवरात्रीच्या दिवशी कुही तालुक्यातील किन्ही गावच्या एका वृद्धाने स्वतःचं सरण रचून आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आला आहे.

     चितेत उडी घेण्यापूर्वी वृद्ध शेतकऱ्याने सरणाची मृत्यूपूर्वी विधिवत पूजा केल्याचे घटनास्थळी दिसून आले. या घटनेने सर्वत्र खळबळ माजले असून आत्माराम मोतीराम ठवकर (वय वर्ष ८०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे वडील होते.मयत आत्माराम ठवकर सधन कुटुंबातील असून ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे व वारकरी संप्रदायाचे होते. २००६ मध्ये त्यांच्या श्वसनलिकेवर शस्त्रक्रिया झाली होती. परंतु, हे दुखणे अजूनही सुरूच होते.

       प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, मृतकाच्या  वृद्धाच्या मुलाची गॅस गोडावूनलगत शेती आहे.सदर इसमाने मृत्यूच्या रात्री गावात मंडईनिमित्त आयोजित नाटकाचा रात्रभर आनंद घेतला. पहाटे गावातील मंदिरात पूजा-अर्चा करून ते शेताकडे आले. शेतातील लाकडे गोळा करून सरण रचले. त्यावर तणस पसरवले. विड्याच्या पानावर दिवे लावून सरणाची पूजा केली. त्यानंतर सरण पेटवून चितेत उडी घेतली, असा घटनाक्रम असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह अर्धवट स्थितीत जळाल्याचे दिसून आले.

      घटनेनंतर मुलासह नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेत वेलतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आनंद कविराज यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. तत्काळ पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा दरम्यान, सरणावर अर्धवट मृतदेह व शेजारी पेटलेला दिवा आढळला. या घटनेचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीतेश डोर्लीकर व पोलीस शिपाई सुरपाम करीत आहे.

              घरच्यांचा बोलण्यास नकार दिल्याने वृद्ध शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर परिसरात अनेक तर्कविर्तक व्यक्त केले जात आहे. वृद्धाची कौटुंबिक परिस्थिती सधन असून कुटुंब उच्चशिक्षित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा