Breaking

बुधवार, २ मार्च, २०२२

*चॉकलेटच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; मुलगी राहिली गर्भवती*

 

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार


    देशात महिलांच्या वर होणाऱ्या अन्याय मध्ये सातत्याने वाढ होत असून यामध्ये  अल्पवयीन मुलीं लैंगिक शोषणाच्या बळी पडत आहेत अशीच एक घटना ओरिसा राज्यातील मान याठिकाणी घडल्याची समोर येत आहे.

      एका तरुणाने वाढदिवसाच्या निमित्ताने जवळीकता वाढवून चॉकलेट देण्याच्या बहाण्याने एकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. सदर पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

     मुळशी तालुक्यातील माण येथे ११ नोव्हेंबर २०२१ रोजी व त्यानंतर वेळावेळी हा प्रकार घडला. संशयित आरोपी ग्यानरंजन उर्फ मंगू ताडू (१९, रा. माण, ता. मुळशी, मूळ रा. उडीसा) याच्या विरोधात पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी १६ वर्षीय मुलीच्या वडिलांनी सोमवारी (दि. २८ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

     पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिला चॉकलेट दिले.त्यानंतर दोन दिवसांनी मुलीचे आई-वडील व भाऊ हे कामानिमित्त बाहेर गेल्याचे पाहून आरोपी पुन्हा फिर्यादीच्या घरी आला. त्यावेळी त्याने पीडित मुलगी व तिच्या लहान भावाला चॉकलेट खाण्यास दिले.चॉकलेट खाल्ल्यानंतर मुलीला झोप लागली. त्यावेळी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

   सदर घटनेची सखोल तपास हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा