Breaking

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी कु.निलम संजय चौगुले यांची शिवाजी विद्यापीठाच्या महिला खो-खो कर्णधारपदी पदी निवड*

 

जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थिनी

करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी 


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज मधील विद्यार्थी सातत्याने विविध क्षेत्रात गगन भरारी घेत आहेत. मात्र शिवाजी विद्यापीठाच्या महिला खो-खो टीमच्या कर्णधार पदी तिची निवड झाली आहे. तसेच अन्य तीन विद्यार्थिनींची ही निवड राष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेसाठी झाली आहे.

    जयसिंगपूर कॉलेज मधील महिला खो-खो खेळाडू सातत्याने आपली चमकदार कामगिरी करीत आहेत. यामध्ये शिवाजी विद्यापीठ महिला खो-खो टीमचा कर्णधार पदी विराजमान झाली आहे. त्याचबरोबर वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत येथे होणाऱ्या आंतर-विद्यापीठ पश्चिम विभागीय महिला खो-खो  स्पर्धामध्ये जयसिंगपूर कॉलेजच्या ४ महिला खेळाडूंची शिवाजी युनिव्हर्सिटीच्या संघात निवड झाली आहे.


1) कु.निलम संजय चौगुले 


2) कु.साक्षी विजय आंबी


3) कु.प्राजक्ता सुरेश माने


    या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सुयशात संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार मा.पद्माकर पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य त्याचबरोबर कॉलेजच्या प्र. प्राचार्य डॉ. मनिषा काळे, फिजिकल डायरेक्टर डॉ. महादेव सुर्यवंशी, कार्यालयीन अधिक्षक संजीव मगदूम, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा