Breaking

शनिवार, १२ मार्च, २०२२

*निढोरी मार्गावर व्हनुर फाटा येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत चुलता व पुतण्याचा मृत्यू*

 

व्हनूर फाटा येथे चुलता व पुतण्याचा अपघाताने मृत्यू


कागल : तालुक्यातील निढोरी मार्गावर व्हनुर फाटा येथे एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार बापुसो यशवंत तळेकर व सुरेश दिनकर तळेकर यांचा जागीच मृत्‍यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दोघेही कागल तालुक्यातील केनवडे गावचे रहिवासी आहेत.

    अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हा अपघात पहाटे ५.०० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अपघातातील मयत हे चुलता व पुतणे असून ते पहाटे केनवडे गावाकडे मोटरसायकलवरून जात होते. त्यावेळी एका अज्ञात वाहनाने त्‍यांना जोराची धडक दिली. यामध्‍ये दोघेही जागीच ठार झाले.

       या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा