साजणी येथे एकाची हत्या |
हातकणंगले तालुक्यातील साजणी येथे जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुनाफ सत्तार मेकर वय वर्ष ६८ रा. कबनूर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यातील संशयित हल्लेखोर आरोपी नितिन कोनेरे (रा. साजणी) हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. एन. पाटील सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनांस्थळाचा पंचनामा केला आहे. इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधिक्षक बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल तपासांबाबत सूचना दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या घटनेने सदर परिसरात खळबळ माजली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा