![]() |
औरवाड च्या डॉ. माधुरी आणुजे पीएच.डी.पदवी प्राप्त |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
औरवाड : कॅन्सर या विषयात पी.एच. डी. व रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर ची क्लास वन पोस्ट मिळवणारी डी. वाय. पाटील मधील पहिलीच विद्यार्थ्यांनी होय.माधुरी प्रताप आणुजे या विद्यार्थ्यांनीने D.Y.Patil university मधून medical physics मध्ये कॅन्सर या विषयात शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च मानले जाणारे डॉक्टरेट ( पीएच.डी.) ही पदवी संपादन केली.
शिरोळ तालुक्यातील औरवाड सारख्या खेडे गावात जन्मलेली , सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेली, परिस्थितीने गरिब पण बुद्धीने हुशार व वैज्ञानिक जिज्ञासा अंगी बाळगलेली माधुरी लहानपणा पासूनच खूप हुशार होती. अगदी शालेय जीवनापासून शिक्षण व कुटुंब या दोन्ही जबाबदारी पार पाडत तिचा प्रवास सुरु असायचा.तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद औरवाड, माध्यमिक शिक्षण श्री विद्या मंदिर हायस्कूल नृसिंहवाडी, आणि महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे भौतिकशास्त्र विषयामध्ये पदवीचे शिक्षण(बी.एस.सी) पूर्ण केले.
त्यानंतर डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर येथे पदव्युत्तर (एम.एस्सी) सचे शिक्षण प्रथम क्रमांकाने पूर्ण केलं. संपूर्ण पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण शिष्यवृत्ती व स्वतः क्लासेस घेऊन, स्वखर्चाने पूर्ण केले.याच जोरावर 'भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबई' मधून परीक्षा उत्तीर्ण होऊन सध्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली पुणे येथे रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.
सोबतच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून 3 शोधनिबंध व राष्ट्रीय पातळीवर एक शोध निबंध ति सादर केले व दोन पुस्तकांचे लेखन केले आहे .
या विद्यार्थ्यांनीने "medical physics या विषयात Role of superparamagnetic iron oxide nanoparticle as Radiotherapy sensitizer in colorectal cancer" या विषयात Ph.D. पदवी संपादित केली.
डॉ. अणुजे यांनी खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. या विद्यार्थिनीचे शिरोळ तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा