Breaking

गुरुवार, ३ मार्च, २०२२

*कोल्हापूरचा महावितरण सहाय्यक अभियंता बिले मंजूर करण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात*

 

सहाय्यक अभियंता, धर्मराज काशीदकर


*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*


  कोल्हापूरच्या महावितरण ग्रामीण विभाग-२ अंतर्गत तक्रारदाराची ट्रान्सफार्मर लोडिंग अनलोडिंगच्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी १५ हजारांची लाच घेतल्या प्रकरणी सहाय्यक अभियंत्याला लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

       प्राप्त झालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून आज बुधवार दि.२ रोजी  रंगेहाथ अटक केली. धर्मराज विलास काशीदकर वय वर्ष ४० असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

        तक्रारदाराने महावितरण ग्रामीण विभाग-२ अंतर्गत ट्रान्सफार्मर लोडिंग अनलोडिंगची कामे केली होती. त्याची बिले मंजूर करण्यासाठी सहाय्यक अभियंता धर्मराज काशीदकर याने तक्रारदारांकडे १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती .त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीनुसार महावितरणच्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून धर्मराज काशीदकर याला १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

      एकाबाजूला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे महावितरण विभागाविरोधात आंदोलन सुरू आहे. अशावेळी सदर घटनेने महावितरण अधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी साशंकता निर्माण झाली असल्याचे लोकांकडून उघडपणे बोललं जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा