Breaking

शुक्रवार, १ एप्रिल, २०२२

चिपरी बेघर येथे सापडले दुर्मिळ उदमांजर. अॅनीमल सहारा फाउंडेशन चे सदस्य प्राणीमित्र अक्षय मगदूम व वनरक्षक मच्छिंद्र नव्हाळी यांनी केले सुरक्षित रेस्क्यु.

 

संग्रहित छायाचित्र - उदमांजर

✍🏼 मालोजीराव माने - कार्यकारी संपादक


      गुरुवार दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी चिपरी बेघर येथे राजेंद्र भानुसे यांच्या घरी दुर्मिळ उदमांजर दिसून आले. अॅनीमल सहारा फाउंडेशन चे सदस्य प्राणीमित्र अक्षय मगदूम यांनी वनरक्षक मच्छिंद्र नव्हाळी यांच्या सोबतीने त्याला सुरक्षित रेस्क्यु केले.

        उदमांजर शारीरिकदृष्ट्या ठीक असल्याची खात्री करून वनविभाग व अॅनीमल सहारा फाउंडेशन, जयसिंगपूरने त्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडले. यावेळी वनरक्षक मच्छिंद्र नव्हाळी व अॅनीमल सहारा फाउंडेशन जयसिंगपूरचे सदस्य अक्षय मगदूम, गोविंद सरदेसाई, यश मगदूम, हणमंत न्हावी तसेच जय हिंद न्यूज चॅनलचे संपादक प्रा.डॉ.प्रभाकर माने व मालोजीराव माने उपस्थित होते. या रेस्क्यु ऑपरेशन साठी वनक्षेत्रपाल रमेश कांबळे तसेच वनपाल रॉकी देसा यांचे मार्गदर्शन लाभले.








उदमांजराबद्दल विशेष माहिती : 

       यांचा रंग साधारण काळसर मातकट असतो. मातकट रंगाच्या यांच्या पाठीवर काळे पट्टे असतात. या प्राण्याला लांब शेपटी असते. टोकाकडे काळसर असलेली मातकट शेपटी झुपकेदार असते. यांचे पंजे काळ्या रंगाचे असतात तर पायावर भुरकट ठिपके असतात. संपुर्ण अंगावर राठ केस असतात. याची उंची एक ते दोन फ़ुटापर्यंत तर वजन ३ ते ५ किलो असते. या प्राण्याच वैशिष्ट्य म्हणजे याला स्वत:च्या मिशा पुढेमागे हलवता येतात. आणि याचं नाक व डोळे उत्तम काम करतात. ही उदमांजर स्वत:च्या हद्दी आखून घेतात. यासाठी गुदद्वाराजवळ असलेल्या ग्रंथीचा वापर ते करतात. जमिनीवर हा भाग घासून स्वत:ची हद्द ते आखून देतात.


हा प्राणी खातो काय ? 

उदमांजर मिश्र आहारी आहे. मिश्र आहारी म्हणजे शाकाहारी तसेच मांसाहारी. शाकाहारामधे झाडाची फळे, फ़ुले आवडतात. आणि मांसाहार म्हणजे खेकडे, उंदीर, बेडूक, किडे, पाली, लहानसहान साप आणि कधीकधी पक्षी आणि त्यांची अंडी यांना आवडतात. 

      उदमांजर हे निशाचर असून फक्त रात्रीच अन्नासाठी बाहेर पडते. दिवसा हा प्राणी झाडावर किंवा बिळात लपून बसतो. हा प्राणी अत्यंत लाजाळू असून माणसापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. यापासून मनुष्यास कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा