Breaking

सोमवार, १४ मार्च, २०२२

*किल्ले विशाळगड येथे जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम*

 


विशाळगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान संपन्न


*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी किल्ले विशाळगड येथे किल्ले संवर्धन अभियानांतर्गत दोन दिवसीय स्वच्छता मोहीमेचा उपक्रम राबविण्यात आला.

     शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.अभय जायभाये व प्राचार्य डॉ.सौ.मनिषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने व डॉ. के.डी.खळदकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर शनिवार दि.५ व रविवार ६ मार्च २०२२ रोजी दोन दिवसीय स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


      विशाळगड येथील भोसलेवाडी परिसरातील राजवाडा( पंतप्रधान वाडा) मधील तणकट काढणे, दगड व्यवस्थित करणे, चरीमधील माती काढणे  त्याचबरोबर चंद्राकार विहीर परिसरातील काचेच्या बॉटल्स, प्लॅस्टिक बॉटल व अन्य प्लॅस्टिक संकलित करण्यात आले. तसेच विहिरीतील झुडूपे तोडणे, विहिरीच्या पाण्यातील कचरा गोळा काढणे अशी कामे स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने केली.

    विशाळगडाच्या पायथ्यापासून ते  दर्गा पर्यंतचा मुख्य मार्गावरील प्लॅस्टिक बॉटल व रँफर्स गोळा करण्यात आले. तसेच सदरचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळेस दोन पर्यटकांनी स्वेच्छेने या अभियानात सहभागी होऊन स्वच्छता केली. एन एस एस स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

        सदरच्या कामी उपसरपंच सौ.जंगम व  पोलीस पाटील श्री.जंगम यांचे सहकार्य लाभले.

1 टिप्पणी:

  1. सर्व एन.एस .एस स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे व कार्यक्रम अधिकारी डॉ. पी टी.माने सर यांचे खूप खूप अभिनंदन !

    उत्तर द्याहटवा