व्यवसायिक गॅस महागले |
इंधनाच्या दरात जागतिक पातळीवर सातत्याने बदल होत असतात या बदलाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर दरात ₹ १०५ ने वाढ केली आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आता २०१२ रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे ५ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे दर देखील २७ रुपयांनी वाढून ५६९ रुपयांवर गेले आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र स्थिर ठेवले आहेत.
वैश्विक बाजारातील तेल कंपन्यांच्या चढ-उतारानुसार दर महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलिंडर दरात बदल केले जातात. त्यानुसार मंगळवारी व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात वाढ करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यात १ फेब्रुवारीला व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात ९१.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
आनंदाची बाब अशी आहे की, घरगुती गॅस सिलेंडर दर स्थिर ठेवल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा