![]() |
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. दिपक ठमके |
*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
इचलकरंजी - स्वतःतील बलस्थाने शोधा , असे मत डॉ. दीपक ठमके (प्रसारण अधिकारी सांगली आकाशवाणी सांगली ) यांनी शिवाजी विद्यापीठ , अग्रणी महाविद्यालय, योजनेअंतर्गत श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय , इचलकरंजी मराठी विभाग आयोजित , प्रसार माध्यमातील रोजगाराच्या संधी या एकदिवसीय कार्यशाळेत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, माणसाला काम नाही तर कला जिवंत ठेवते . आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीमधील विविध रोजगाराच्या संधी कशा असतात . त्यातील सूक्ष्मता सांगितली. रेकॉर्डिंग विभाग , स्टुडिओ , प्रोग्रॅम विभाग , जाहिरात , संहिता लेखन याबाबत माहिती दिली. रोजगाराबरोबरच सन्मान महत्वाचा असतो. छंद आणि व्यवसाय यामध्ये सांगड घालणे गरजेचे असते. पैसे महत्वाचा नाही, तो मिळतच असतो., सकारात्मकता महत्वाची असते . स्वतःचीच बलस्थाने शोधता आली पाहिजेत. अशा विविध घटकांना स्पर्श करत रोजगाराच्या संधी बद्धल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे श्री बसवराज कोटगी ( (उपसंपादक दै . महासत्ता ) यांनी वृत्तपत्र विभागातील रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. पत्रकार हा पंतप्रधानांपासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत संवाद साधू शकतो. समाज जागृती वृत्तपत्रातूनच होत असते. वृत्तपत्राची विभागणी वेगवेगळ्या पद्धतीची असते. त्यानुसार बातमी लावली जाते. वाचकांचा पत्रव्यवहार , अग्रलेख, संपादक , उपसंपादक, बातमी लेखन, वार्ताहर, मुक्त पत्रकार, प्रूफरीडर , प्रिंटिंग अशा वेगवेगळ्या स्तरावरील संधी वृत्तपत्रातून मिळतात. आवृत्ती प्रमुख , व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी ही महत्वाची पदे पत्रकारितेतून निर्माण होतात. पत्रकारितेचा इतिहास खूप मोठा आहे. अभ्यास आणि सकारात्मक दृष्टीकोन हाच परतकारीतेचा पाय आहे, असे मत त्यांनी मांडले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील हे होते. तुम्हाला जर नावीन्य हवे असेल तर प्रसार माध्यमातील विविध क्षेत्रे महत्वाची आहेत. अथक परिश्रम स्वतःमधील कलागुण जोपासणे आणि छंदाबरोबर व्यवसायाची सांगड घालणे अत्यंत महत्वाची आहे. स्वतःचे करियर निवडता आले पाहिजे. असे मत अध्यक्षीय मनोगतात मांडले. याप्रसंगी डॉ. संतोष बोराटे हे हे उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. सुभाष जाधव यांनी केली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. प्रियांका कुंभार यांनी केले. याप्रसंगी प्रा. डॉ.एकनाथ पाटील ,प्रा. भरती कोळेकर , कु. पुष्पा पाटील, कु. पल्लवी कोळी यांनी मनोगत व्यक्त केली.
या कार्यशाळेसाठी प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व सेवक विद्यार्थी - विद्यार्थिनी मोट्या संख्येने उपस्थित होते. सादर कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रतिभा पैलवान यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा