![]() |
कोकम सरबतचे वाटप करताना स्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्था पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते |
*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*
जयसिंगपूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज पालखी सोहळानिमित्त स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने भाविकांना मोफत कोकम सरबत चे वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे जयसिंगपूर चे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा होऊ शकली नाही. मात्र यावर्षी कोरोना महामारीचे पूर्ण निर्बंध दूर केल्याने श्री सिद्धेश्वर यात्रा मोठ्या थाटामाटात भरवण्यात आली आहे. १ मार्च,२०२२ रोजी यात्रेच्या पहिल्या दिवशी अर्थात श्री सिद्धेश्वर महाराज पालखी सोहळा अत्यंत श्रद्धा व भावनापूर्ण पद्धतीने सुरू होता. शेकडो लोक या पालखी सोहळ्यात सहभागी होते.
स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जयसिंगपूर च्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षीही पालखी मध्ये सहभागी असणाऱ्या भाविकांना मनोभावे कोकम सरबतचे वाटप करून श्री सिद्धेश्वर महाराजांबद्दल ची आस्था दाखवून दिली. ही संस्था सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक व मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडवीत असते. संस्थेचे अध्यक्ष एजाजभाई मुजावर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे सर्व पदाधिकारी , व सामाजिक कार्यकर्ते यांच्या द्वारे हा समाजशील उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात तेजस कुराडे-देशमुख शिवसेना शहर प्रमुख जयसिंगपूर, निर्भिड पत्रकार रोहित जाधव ,मोबीन मुल्ला- जितेंद्र आव्हाड युवामंच प्रदेश संघटक, जयसिंगपूर नगरीचे संपादक मेहबूब सय्यद,प्रा.डॉ.प्रभाकर माने, अरुण लाटवडे उपशहरप्रमुख जयसिंगपूर,ऐनापुरे सर, इक्बाल जमादार, सुरेश राठोड, शाहिद सय्यद, शादाब सय्यद, व इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा