Breaking

सोमवार, ११ एप्रिल, २०२२

सलग अठरा तास अभ्यासातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन - शिरोळच्या फुले - शाहू - आंबेडकर विचारमंचाचा कौतुकास्पद उपक्रम

 



       शिरोळ - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने 'सलग अठरा तास अभ्यास' विशेष उपक्रम दत्त पॉलिटेक्नीक कॉलेज, शिरोळ येथे आयोजित करण्यात आला होता. उपक्रमाची सुरुवात सकाळी 6.00 वाजता राष्ट्रगीताने झाली. दीपप्रज्वलन डॉ. यशकाश्यपायन महाथेरो यांच्या हस्ते व सेवक ग्रुप शिरोळ यांच्या उपस्थितीत झाला.   

       सकाळी 11 वाजता इंदजित देशमुख अध्यक्ष, शिवम प्रतिष्ठान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांनी विदयाथी व वाचक यांना मार्गदर्शन केले. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व प्रमुख उपस्थिती बौद्ध उपासक मा. संजय बनसोडे यांची होती. 





       दुपारी 3 वाजता श्री. बी. जी. घाडगे यांनी ' हसत खेळत इंग्रजी शिका ' विषयी मार्गदर्शन केले. सायं 7 वाजता उदबोधनपर व्याखान करताना डॉ. युवराज पवार यांनी नवे शैक्षणिक धोरण व शैक्षणिक भविष्य याबद्दल मार्गदर्शन केले. तर डॉ. पाखरे, तालुका आरोग्य अधिकारी यांनी अभ्यासामुळे येणार ताण कसा कमी करायचा व आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे यावर मार्गदर्शन केले. रात्री 11.30 वाजता मनोगत व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.



      या उपक्रमात 106 विद्यार्थी व वाचक यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. उपक्रमाचे विशेष म्हणजे विद्यार्थ्याबरोबरच व्यवसायीक, विविध सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होते. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान, विश्वकोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन, चरित्र, अनेक महापुरुषाचे स्पर्धा परीक्षा, विद्यापीठ परीक्षा यांचा अभ्यास केला.


      या उपक्रमास श्री. अशोक कांबळे (बॅक). प्रा. विजयकुमार शिरोळकर, सचेतन बनसोडे, निलेश शिरोळकर, राजेंद्र प्रधान, चिदानंद कांबळे, दिपक महानाम, प्रकाश कांबळे, प्रशांत माने, दत्तात्रय खोराटे, रणदिवे सर, खंडेराव हेरवाडे, माणिक विटेकरी, सतिश कोरे, भारत ढाले, राजेंद्र दाभाडे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा