Breaking

सोमवार, ११ एप्रिल, २०२२

*इचलकरंजीत एकाचा दगडाने ठेचून खून*


इचलकरंजीत सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून


     इचलकरंजी : इचलकरंजी शहरात सातत्याने वाढती गुन्हेगारी ही डोकेदुखी बनत चालली आहे. शहरातील वखार भाग येथे उदय मधुकर गवळी (वय वर्ष ४०, रा. रेणुका नगर झोपडपट्टी) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्जनस्थळी डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.मात्र खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.कौटुंबिक कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

   वखार भाग येथे मोहन आर्केडच्या पाठीमागे पडीक जागा आहे. या ठिकाणी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह आढळून आला. तातडीने शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डोक्यात दगड घालून हा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे. दगडाच्या घावाने डोके जमिनीत खोलवर रुतल्याचे दिसून येत होते.

    घटनास्थळी  पोलीस उपधीक्षक बी. बी. महामुनी दाखल झाले. मृत व्यक्ती हा रेकॉर्डवरील गुन्हेगार उदय गवळी असल्याचे निष्पन्न झाले आहे.आठवडाभरा पूर्वी आजीला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा