Breaking

शनिवार, ९ एप्रिल, २०२२

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील ने जिंकली मानाची महाराष्ट्र केसरी गदा. तब्बल २१ वर्षानंतर कोल्हापूरला मिळाला किताब.




 सातारा:   यंदाची महाराष्ट्राच्या मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांनं पटकावली. कोल्हापुर जिल्ह्याला हा किताब २१ वर्षांनंतर मिळाला, माती प्रकारातुन आलेला प्रकाश बनकर याला पराजीत करुन पृथ्वीराज पाटील यानं हा किताब पटकावलाय. तर मुंबईचा पैलवान प्रकाश बनकर याला उपमहाराष्ट्र केसरी किताब मिळाला.

         शेतकरी कुटुंबातून आलेल्या अवघ्या १९ वर्षांचा असलेला पृथ्वीराज पाटील यांनी केलेली कामगिरी ही कौतुकास्पद मानली जातीये.


कोण आहे पृथ्वीराज

पृथ्वीराज बाबासाहेब पाटील, देवठाणे तालुका पन्हाळा, शिक्षण १२ वी

>> सुरवातीचा आखाडा शाहु कुस्ती केंद्र कोल्हापुर शिंगणापुर

>> द मराठा लाईट इंन्फंन्ट्री रेजिमेंट बेळगाव हवलदार

>> आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच सुभेदार रामचंद्र पवार , सुभेदार शिवाजी पाटिल , सुभेदार रणजीत महाडीक,

>> जागतीक जुनिअर अजिकंपद स्पर्धा २०२१ रशिया कास्य पदक ९२ किलो गट

>> जागतीक वरीष्ठ अजिंक्यपद स्पर्धा नाॅर्वे २०२१ सहभाग

>> सिनीअर नॅशनल चॅम्पीयन स्पर्धा २०२० रौप्य

>> नॅशनल जुनिअर कुस्ती स्पर्धा २०२१ सुवर्ण पदक

1 टिप्पणी: