शिरोळ येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंच वतीने रविवार दि १० एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजवर 'सलग १८ तास अभ्यास' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ६ वाजता भदंत डॉ. यशकाश्यपायन महाथेरो यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे. तर अध्यक्ष म्हणून मा. पृथ्वीराज यादव व प्रमुख उपस्थिती पत्रकार दगडू माने व सेवक ग्रुप, शिरोळ यांची असणार आहे.
सकाळी ११ वाजता श्री दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होणार आहे. यावेळी शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंद्रजित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भूषविणार आहेत. या कार्यक्रमास उदगाव टेक्निकल कॉलेजचे स्कूल कमिटी चेअरमन श्री.बाळासाहेब कोळी, बौध्द उपासक संजय बनसोडे, , डॉ. उमेश कळेकर, डॉ. प्रमोद काळे उपस्थित राहणार आहेत.
दुपारी २ वाजता हसतखेळत इंग्रजीला अभ्यासा या विषयावर बी.जी. घाटगे मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थान प्रा. दयानंद बोंदर भूषविणार आहेत. प्रा.डॉ.प्रभाकर माने, अन्वी अविनाश जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सायंकाळी ६ वाजता कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांचे प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. यावेळी प्रा. डॉ. युवराज पवार, खंडेराव जगदाळे हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
रात्री साडेआकरा वाजता मनोगत आणि समारोप कार्यक्रम होणार आहे. शिरोळचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने भूषविणार आहेत. यावेळी अॅड. इंद्रजित कांबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. यावेळी अँड ई.जी नदाफ आणि राजेंद्र गाडेकर प्रमुख उपस्थित म्हणून राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर, उपाध्यक्ष महादेव शिरोळकर, स्वागताध्यक्ष राजेंद्र प्रधान, विश्वस्त अशोक कांबळे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मुरलीधर कांबळे, सचिव चिदानंद कांबळे व कार्यवाह मा. निलेश शिरोळकर , ऑडिटर सचेतन बनसोडे, खजिनदार प्रकाश कांबळे व दत्तात्रय खोराटे , प्रशांत माने यांनी केले आहे.
संयोजकांनी नाव नोंदणीसाठी शिरोळ कचेरी बस स्टॉप नजीकच्या सेवक पेपर स्टॉल येथे करावी असे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा