Breaking

रविवार, १० एप्रिल, २०२२

*जयसिंगपूरातील शाहूनगर मधील महिला आपल्या ८ वर्षीय मुलीसह बेपत्ता*

 

शाहूनगर मधील महिला मुलीसह बेपत्ता


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


     जयसिंगपूर  : शाहूनगर भागातील सुदर्शन चौकात राहणारी २५  वर्षांची महिला माहेरी जाते असे सांगून मुलीसह वय वर्षे ८ या ६ एप्रिल,२०२२ पासून बेपत्ता आहे अशी वर्दी पती सलीम अकबर सय्यद यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. 

    करिष्मा सलीम सय्यद व मुलगी आलिया सलीम सय्यद रा. शाहूनगर सुदर्शन चौक अशा बेपत्ता झालेला मायलेकींची नावे आहेत.पती सलीम व सासरे अकबर सेंट्रींग व्यवसाय काम करत आहेत. सायंकाळी चार वाजता राहत्या घरातून माहेरी सांगली येथे जाते असे सांगून मुलगी आलियासह घरातून निघून गेले आहे. अध्याय पर्यंत पर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेतला व सापडले नसल्यामुळे पति सलीम यांनी पोलीसात वर्दी दिली आहे. महिलेची उंची पाच फूट चार इंच- रंगाने गोरी-चेहरा गोल -नाक जाड-डोळे काळे- कानात बेन्टेक्स चे टॉप -गळ्यात बेन्टेक्सचे मणी मंगळसूत्र-हातात हिरव्या बांगड्या- पायात जोडवी पैंजण-चप्पल अंगावर लाल रंगाची चुडीदार- मराठी कन्नड भाषा बोलते असं वर्णन आहे. 

     सहायक फौजदार सोमनाथ चळचूक अधिक तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा