![]() |
शाहू आर्मी कडून पालखी सोहळ्याचा बंदोबस्त |
*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेस शुक्रवार १ एप्रिल २०२२ पासून प्रारंभ झाला. शुक्रवारी सिद्धेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक सोहळा पासून सुरुवात झाली.
गेली दोन वर्ष कोरोना महामारी मुळे बंद असलेली श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा यावर्षी अगदी थाटामाटात सुरुवात करण्यात आली. यामध्ये सर्वात आकर्षणाचा बिंदू ठरला तो म्हणजे मातोश्री सोशल फाऊंडेशन संचलित शाहू आर्मी या आर्मीची स्थापना मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन आवळे यांनी केली असून हि आर्मी म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची तुकडी असल्याचे त्यांनी सांगितले, या आर्मी मध्ये शिरोळ तालुक्यामधील विविध गावातील तरुण व तरूणींचा सहभाग आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर बाधित असलेल्या शिरोळ तालुक्यामधील गावातील तरुणाचा सहभाग उल्लेखनीय आहे. या तुकडीचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सिद्धेश्वर महाराज यांचे यात्रा सेवाभावी वृत्तीने काम म्हणून शाहू आर्मीचा जवानानी बंदोबस्तामध्ये सहभाग घेतला.
जयसिंगपूरचे मा. उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी शाहू आर्मीचे कौतुक करीत पुढील कारकीर्दीस शुभेच्छा देऊन आपणाकडून सर्व परी सहकार्य करण्याची भावना त्यांनी व्यक्त केले.
सदर बंदोबस्तामध्ये हर्षल यादव, मातोश्री सोशल फाऊंडेशनचे सचिव सुशांत चुडाप्पा, खजिनदार रमेश घाटके, अर्जुनसिंग राजपूत, मेहबूब मुजावर, नेहा राठोड, श्रुती यादव, आकांक्षा शिरोळकर, दिव्या रासूरे, अंकिता सातपुते,बोलू शर्मा, विवेक कांबळे, तेजस राठोड, सत्यजित माने, ब्रिरेश खांडेकर, ओंकार कोळी, युवराज मगदूम, झहीरखान मोकाशी, अजय पाटील, संकेत गावडे, गौरव पाटील ओंकार पाटील इत्यादी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा