![]() |
मा.शरद पवार व मा.अशोक बंग अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील समाजभूषण पुरस्काराने सन्मानित |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
शिरोळ : शिरोळच्या श्री दत्त कारखानास्थळी अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील समाज भूषण पुरस्काराचे वितरण अत्यंत थाटामाटात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे होते
सुरुवातीस या कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत व सत्कार आदरणीय कृषी पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते पार पडले. यानंतर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. अग्रोवनचे माजी संपादक निशिकांत भालेराव यांनी सत्कार मूर्तीच्या विषयी मोजक्या शब्दात उत्तम पद्धतीने मनोगत व्यक्त केले.
समाज भूषण पुरस्काराचे मानकरी अशोक बंग यांचे मानपत्र वाचन करून सदर पुरस्कार श्रीनिवासजी पाटील यांच्या हस्ते अशोक बंग यांना प्रदान करण्यात आला. यामध्ये शाल,श्रीफळ, मानपत्र व एक लाख रुपये देण्यात आले. तसेच माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या मानपत्राचे वाचन करून श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मा.शरदचंद्र पवार यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
मा. गणपतदादा पाटील यांनी क्षारपड मुक्त शेती करण्याचा केलेला प्रयत्न लक्षात घेऊन क्षारपडमुक्त शेतकरी संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या मनोगतामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व श्रीनिवास पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त करीत स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील व गणपतराव दादा पाटील यांच्या कार्या विषयी उत्तम भाष्य केले.
समाज भूषण पुरस्कार सन्मानित अशोक बंग सत्काराला उत्तर देताना म्हणाले, शेतकऱ्याचा सन्मान होणे आवश्यक असून संपूर्ण शेतकी समाज हा देशाचा तारणहार आहे. काळाच्या ओघात सरकारने शेतकी घटकाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी पंच सूत्रे सांगितले.
माजी कृषिमंत्री व खासदार शरद राव पवार म्हणाले, माझा सन्मान हा देशातील समस्त शेतकरी कुटुंबाचा सन्मान आहे. आज पुरस्कार स्वीकारणे साठी आलो पण फक्त सारे पाटलांच्या प्रेमाखातर व त्यांनी आजपर्यंतची सर्व घटकासाठी केलेली कामगिरी म्हणून आलो आहे. ते पुढे म्हणाले, माझ्या राजकीय कारकीर्दीत कृषीमंत्री म्हणून केलेलं काम मला समाधान देणारे आहे. त्यांनी समस्त शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी उत्तम मांडणी करून केंद्र शासनाच्या कृषी धोरणा विषयी संताप व्यक्त केला. मी कृषिमंत्री पदाचा धुरा सांभाळल्यानंतर अन्नधान्याची आयात करण्याची नामुष्की आली होती परंतु अथक प्रयत्नानंतर व उत्तम कृषी धोरणाने देश निर्यातक बनला आहे. सत्तेसाठी ते म्हणाले गणपतराव पाटील यांनी सारे पाटील यांच्या विचाररांचा वसा व वारसा जपण्याचे काम केले असे म्हणत त्यांनी क्षारपड मुक्त जमिन करण्याचा त्यांचा प्रयत्नाचे कौतुक केले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास हसन मुश्रीफ बाळासाहेब पाटील पालकमंत्री सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, निवेदिता माने, खासदार संजय मंडलिक, राजू शेट्टी, पी एन पाटील, प्रभाकर कोरे, माजी खासदार हुक्किरे, नगराध्यक्ष पाटील व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्तम आभार संचालक मा.शेखर पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाचे नेमकेपणाने व सुंदर सूत्रसंचालन गायत्री कुलकर्णी, महेश घोटणे व किरण पाटील यांनी केले.
सदरचा पुरस्कार वितरण सोहळा अविस्मरणीय असल्याबाबतची प्रतिक्रिया उपस्थित सभासद शेतकरी व अन्य घटकांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा