![]() |
तपस्या हेल्थ व वेलनेस या आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
निमशिरगाव : सुप्रसिद्ध आयुर्वेद व योगाद्वारे उपचार व मार्गदर्शन करणाऱ्या तपस्या हेल्थ व वेलनेस सेंटर या आंतरराष्ट्रीय सेंटरचा लोकार्पण सोहळा निमशिरगाव येथे गोव्याचे मुख्यमंत्री मा. डॉ. प्रमोदजी सावंत यांचे हस्ते संपन्न झाला.
प्रारंभिक या आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख डॉ.अमोल पाटील यांनी कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात ते म्हणाले, निमशिरगाव येथील तपस्या हेल्थ व वेलनेस या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या माध्यमातून या निसर्गरम्य व आनंदी वातावरणात आयुर्वेद व योगाद्वारे रुग्णांचे आरोग्य सर्वांग सुंदर, आनंदमय व प्रसन्न करणे हा उदात्त हेतू आहे.
![]() |
उपस्थित असणारा जनसमुदाय |
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोदजी सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले, तपस्या हेल्थ व वेलनेस सेंटर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाराष्ट्रातील एकमेव केंद्र असून या केंद्राच्या माध्यमातून लोकांचे जीवन आरोग्यदायी व सुखकर होणे आता सोपे होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून योग, निसर्गोपचार, मढ उपचार,हायड्रोपचार, ॲक्युपंक्चर या पद्धती व आयुर्वेदिक केंद्र हे अत्यंत आधुनिक व सक्षम असून त्याचा लाभ निश्चितपणे येणाऱ्या रुग्णांना होणार आहे. ते पुढे म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री मोदीनी भारतीय संस्कृती व आयुर्वेदिकचे महत्व ओळखून अशा केंद्रांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे भविष्यात अशा केंद्राची फ्रॅंचेशी संपूर्ण देशात होणे गरजेचे आहे. गोव्यासारख्या राज्यात पर्यटनासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक येत असतात अशा पर्यटकांसाठी गोव्यात या सेंटरची फ्रॅंचेशी व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त करून त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सरतेशेवटी ते म्हणाले, तपस्या हेल्थ हे केंद्र सक्षम व परिपूर्ण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे सेंटर असून जास्तीत जास्त रुग्णांनी अशा केंद्राला भेट देऊन रोगमुक्त व आनंदमय जीवन जगावे.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर तांत्रिक अडचणी उपस्थित राहू शकले नाहीत. याप्रसंगी जयसिंगपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष मा.संजय पाटील यड्रावकर, आमदार मा.महेश लांडगे, निमशिरगाव च्या सरपंच गुरव मॅडम, रावसाहेब पाटील,दलितमित्र मा.अशोकराव माने,मा.समीर कदम, शशिकांत राजोबा ,अश्विनी पाटील प्रसाद जगताप,मा.जमदग्नी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्तम व नेटकं नियोजन केंद्र संचालक डॉ.उमेश गुड्डी, महेश माळी, अश्विनी पाटील यांच्या साथीने डॉ.अमोल पाटील यांनी उत्तम पद्धतीने केले.
"तपस्या हेल्थ व वेलनेस सेंटर" या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या उद्घाटन सोहळा अत्यंत नयनरम्य व निसर्गाच्या वातावरणात संपन्न झाला. खरंच एक केंद्र रोगमुक्त व मानसिक आरोग्य देणारे उत्तम केंद्र असल्याबाबतची प्रतिक्रिया उपस्थित घटकाने दिली आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाने या केंद्राला भेट द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा