Breaking

शनिवार, ९ एप्रिल, २०२२

*शिरोळ तालुक्यातील हरोली येथे पेट्रोल पंपाजवळ आढळला मृतदेह ; आत्महत्या की हत्या? याविषयी साशंकता*

 

महिलेचा मृतदेह आढळला :आत्महत्या की हत्या ?

*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूरातील शाहूनगर येथील महिलेचा मृतदेह हरोली ता. शिरोळ येथील पेट्रोल पंपावर आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मीना मगदूम असे या महिलेचे नाव असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. हा खून आहे की आत्महत्या याचा तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.

    घटनास्थळी बघ्यांची मात्र प्रचंड गर्दी झालेली होती. जयसिंगपूर शाहुनगर ची संबंधित महिला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे त्या महिलेचे नाव मीना मगदूम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.येथील एका पेट्रोल पंपावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. ती माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जाणार आहे त्यानंतरची आत्महत्या की घातपात हे समजणार आहे.

     या घटनेने परिसरात मात्र खळबळ माजली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा