Breaking

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

*प्रा.सौ.विजयमाला चौगुले यांनी मानसशास्त्र विषयातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी केली संपादन*


प्रा.सौ.विजयमाला चौगुले, जयसिंगपूर कॉलेज


*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*


 जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथील मानसशास्र विभाग प्रमुख प्रा.सौ.विजयमाला विरेंद्र चौगुले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा विषय  "इफेक्ट्स ऑफ थिंकिंग स्टाईल्स,जेंडर अँड टाईप ऑफ  स्कूल  बोर्ड ऑन वेल- बिइंग अँड सेल्फ एस्टीम ऑफ सेकंडरी स्कूल स्टुडंट्स " असा होता. नाशिकचे डॉ.नरेंद्र देशमुख पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून लाभले.

      प्रा.सौ. विजयमाला चौगुले यांचा २१ वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव असून मानसशास्त्र विषयातील अध्यापनाची हातोटी प्राप्त केली आहे. मानस शास्त्र विषयाच्या माध्यमातून विद्यार्थी हितार्थ उपक्रमाचे आयोजन करीत असतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संशोधन पेपर सादर केले आहेत.सौ.चौगुले यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थी व असंख्य घटकांशी सुसंवाद साधून सामाजिक संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्यक्रम अधिकारी म्हणून केलेलं काम कौतुकास्पद आहे. कॉलेजच्या विविध समितीच्या माध्यमातून ते सातत्याने कार्यरत असतात.

     पीएच.डी. पदवी संपादणूकीमध्ये स्थानिक समिती जयसिंगपूर कॉलेजचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, सहकारी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

       प्रा. सौ. चौगुले यांनी पीएच.डी. पदवी संपादन केलेबद्दल सर्व घटकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा