Breaking

रविवार, १० एप्रिल, २०२२

*बळवंत कॉलेजमध्ये जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा*


कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. दादासाहेब खोगरे


*प्रा. अक्षय माने  : विशेष प्रतिनिधी*


विटा : बळवंत कॉलेज विटा मध्ये ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून अर्थशास्त्र व बी.बी.ए विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  जागतिक आरोग्य दिनानिमित्त *"उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार"* या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. दादासाहेब खोगरे व अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. एस.मोरे उपस्थित होते.

      मा.डॉ.दादासाहेब खोगरे  यांनी  उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार याविषयी सखोल व चौफेर  मार्गदर्शन केले. तसेच व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध  प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण होते. 


     या कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रवीण बाबर  यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. मोरे आर. एस. यांनी निरोगी आयुष्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फळे आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा असे आवाहन केले.

    सदर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. साधू कोकरे  यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार  प्रा.प्रशांत गांजवे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी बी बी ए विभाग प्रमुख सौ. पाटील एस. एस. व सर्व स्टाफ उपस्थित होता. सदर कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र  व बी बी ए विभागातील पण असंख्य  विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा