![]() |
समारोप शिबिरात मार्गदर्शन करताना माजी खासदार श्रीमती निवेदिता माने |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
रुकडी : येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी विशेष शिबिर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंन्ट्रल यांच्या संयुक्त्त विद्यमाने नुकतेच मौजे मुडशिंगी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा माजी खास. डॉ. निवेदिता माने यांच्या हस्ते झाले. यावेळी मुडशिंगी गावच्या सरपंच सौ मनीषा संग्राम वरिंगे, ग्रामपंचायत सदस्य सौ. नंदा रवींद्र पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत कांबळे रो. यतीराज भंडारी रो. घनश्याम सावलानी, मुडशिंगीं ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. या शिबिरात एकूण ७५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
या शिबिर कालावधीत चोकाक ते मुडशिंगी गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गवत काढून स्वच्छता केली, झाडांना आळी करुन झाडांना पाणी घातले, गटार स्वच्छता, स्मशानभूमी परिसर स्वच्छता, कोरोना लसीकरण सर्वे, पर्यावरण व व्यसनविरोधी जनजागृती प्रभात फेरी असे विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कोरोना सारख्या संकटावर मात करू- डॉ. प्रसन्न पवार, वृक्षवल्ली आम्हा सोयरे- श्री. संदीप बनकर, आहार,विहार आणि विचार- डॉ. नरेंद्र पाटील व प्रेमकुमार चव्हाण, जलसाक्षरता, माझी वसुंधरा- श्री प्रशांत पाटील, व्यसन मुक्त्त समाज काळाची गरज- श्री. राहुल चव्हाण यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. या शिबिरास रो. विमलकुमार बंब, रो.नितीनकुमार कस्तुरे, रो. यतिराज भंडारी, रो. राजू थोरवत प्राचार्य डाॕ. प्रशांत कांबळे, रो. घनश्याम सावलानी यांनी शिबिरास भेट देऊन स्वयंसेवकांना प्रोत्साहन दिले. या शिबिराचे आयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश मोरे डॉ. अशोक पाटील यांनी केले.शिबीर स्थळी डॉ. माधवी सोळांकुरकर डॉ. मुकुंद हळदकर, श्री.अमर बुल्ले, श्री.भाऊसाहेब वडार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा